Kunbi Caste Certificate कुणबी जात प्रमाणपत्र

Kunbi Caste Certificate कुणबी जात

 प्रमाणपत्र प्रक्रिया कसे आणि कुठे,कागदपत्रे,पुरावे

 नोंदी नसल्यास?(संपूर्ण माहिती )


Table of Content:


1.कुणबी प्रमाणपत्र काढण्याची नेमकी प्रक्रिया कशी असते ?

2.जातीचा पुरावा मिळवण्यासाठी पर्याय काय?

3.विदर्भ आणि सातारा, कोल्हापूरमध्ये काय प्रक्रिया असते?

4..मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारच्या जीआरनुसार प्रक्रिया-

5 .सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रे

6.कुणबी नोंदीवरून ४५ दिवसांत जात प्रमाणपत्र

7.अर्जासोबत जोडावीत ‘ही’ कागदपत्रे/कोण-कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील

8 कुणबी जात प्रमाणपत्र कुठे आणि कसे मिळणार ?

9 कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारचा जीआर नेमका कसा आहे ?

10 .कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठं अर्ज करणार/अर्ज कोठे करावा,


नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये Kunbi Caste Certificate याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत

यासाठी लागणारे पुरावे अर्ज कोठे आणि कसा करायचा नोंदी जर सापडल्या नसतील तर काय करता येईल या

सर्व प्रश्नाचे उत्तरे या लेखामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

नवीन जीआर नुसार शिंदे सरकारने नवीन समिती स्थापन करून माननीय श्री संदीप शिंदे रिटायर्ड जज यांच्या

अधिपत्याखाली महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात 45 दिवसात जवळपास 72 लाख पुरावे असे सापडले की

ज्यामध्ये कुणबी मराठा या नावाचा उल्लेख आहे.

मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक

ते अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार,

निजामकालीन संस्थांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी

करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची

कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची

व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आली आहे, असे या नव्या जीआरमध्ये म्हटलं. संपूर्ण राज्यातील मराठा

बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More:Rojgar Sangam Yojana 2024:Maharashtra बेरोजगार युवा भत्ता

Kunbi Caste Certificate:दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की कुणबी कास्ट सर्टिफिकेट मराठवाड्यातील

ज्यांच्याकडे महसूल व इतर निजामकालीन नोंदी सापडल्या असतील त्यांना कुणबी जातीचे सर्टिफिकेट

देण्यात येतील अशी घोषणा शिंदे सरकारने केली आहे मात्र ज्या प्रकारे पूर्वी इतर ठिकाणी जी प्रक्रिया कुणबी

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी केली जात होती त्याच प्रकारची प्रक्रिया मराठवाड्यातही करण्यात येईल का?

असा प्रश्न राहिलेल्या कुणबी जात प्रमाणपत्र मिळवणाऱ्या लोकांना पडला आहे.

kunbi Caste certificate


कुणबी कास्ट सर्टिफिकेट विदर्भातील प्रक्रिया काय असते ?

ज्या लोकांना ऑलरेडी कुणबी कास्ट सर्टिफिकेट झालेले आहेत म्हणजेच मराठवाडा व्यतिरिक्त त्यांची प्रक्रिया

खालील प्रमाणे असते

कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 1967 पूर्वीच्या पूर्वीच्या जन्मलेल्या रक्त नातेसंबंधातील नातेवाईक

जसे वडील चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा वडिलांचे चुलते आत्या आजोबाची चुलते आजोबाची

आत्या पंजोबाची चुलते पंजोबाची आत्या खापर पंजोबाची चुलते किंवा खापर पणजोबाची आत्या यापैकी

कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात प्रमाणपत्र ची फोटोकॉपी किंवा कुणबी जात सिद्ध करणारा पुरावा.

मग आपल्याला प्रमाणपत्र कशे काढता येईल हे आपण पुढे बघणारच आहोत .


01.कुणबी प्रमाणपत्र काढण्याची नेमकी प्रक्रिया कशी असते ?


कुणबी जात प्रमाणपत्र नेमके काढायची कशी किंवा याची प्रक्रिया कशी असते या संदर्भात अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 1967 वर्षी किंवा त्या अगोदर जन्म झालेल्या आपल्या रक्ताच्या नात्यातील म्हणजेच वडिलाकडील सर्व नातेवाईक यांचे कुणबी जात सिद्ध करणारे पुरावे असणे आवश्यक आहे हे सर्व पुरावे तपासल्यानंतर व नातेसंबंध सिद्ध झाल्यानंतर कुणबी जात प्रमाणपत्र चा दाखला देण्यात येतो.काय पुरावे लागतात ते आपण पुढे सविस्तर बघणार आहोतच.

02.जातीचा पुरावा मिळवण्यासाठी पर्याय काय?


शासनाने स्थापित केलेल्या शिंदे समितीने 12 विभागातील पुरावे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्राह्य धरले जातील असे स्पष्ट केले आहे.


०१.जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील कागदपत्रे :रक्ताच्या नात्यातील अगोदरच काढलेले कुणबी प्रमाणपत्र व व्हॅलिडीटी असेल तर हा पुरावा  ग्राह्य धरण्यात येईल


०२.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील डॉक्युमेंट: माजी सैनिकाच्या सर्विस बुक मध्ये जर कुणबी नोंद असेल तरीसुद्धा हा पुरावा ग्राह्य धरल्या जाईल


03.शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील:1967 पूर्वी ज्या व्यक्तीची सर्विस  बुक मध्ये पहिल्या पानावर जर कुणबी नोंद असल्यास.


04.जिल्हा वक्फ अधिकारी:यांच्याकडील

  1. मुंतखब या कागदपत्रात जर कुणबी नोंद असल्यास.

05.भूमी अभिलेख विभाग:

  1. पक्का बुक,
  2. शेतवार पत्रक,
  3. वसुली बाकी,
  4. उल्ला प्रति बुक,
  5. रिविजन प्रतिबुक,
  6. क्लासर रजिस्टर व
  7. हक्क नोंदणी पत्रक यामध्ये जर नोंद असेल तर हा पुरावा देखील यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.

06.सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी:

  1. खरेदीखत नोंदणी रजिस्टर,
  2. डे बुक,
  3. करारखत,
  4. साठेखत,
  5. इसार पावती,
  6. भाडे चिट्ठी,
  7. ठोकपत्रक,
  8. बटाई पत्रक,
  9. दत्तक विधान पत्रक,
  10. मृत्युपत्रक,
  11. इच्छापत्रक,
  12. तडजोड पत्रक
### अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुन्हा सुरू-2024

07.पोलीस विभाग:

  1. गाववारी,
  2. गोपनीय रजिस्टर
  3. सी एक आणि
  4. सी दोन,
  5. क्राइम रजिस्टर,
  6. अटक पंचनामे आणि
  7. एफ आय आर रजिस्टर यामध्ये जर नोंद

08.कारागृह विभाग:

  1. रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिजनर,
  2. कच्च्या कैद्यांची नोंदवही

09.राज्य उत्पादन शुल्क विभाग:

  1. अनुज्ञप्ती नोंदवही,
  2. मळी नोंदवही,
  3. ताडी नोंदवही,
  4. आस्थापना अभिलेख

10.शैक्षणिक पुरावे : स्वतःचा किंवा रक्त संबंधामधील नातेवाईकाचा

  1. प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा
  2. शाळा सोडल्याच्या दाखला 

11.जन्म व मृत्यू रजिस्टर:रक्त संबंधातील नातेवाईकांचा जन्म व मृत्यू झालेल्या गावातील संबंधित तहसीलमध्ये अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नंबर 14 किंवा कोतवाल बुक नक्कल 

12.महसुली पुरावे :

  1. खासरा पत्रक,
  2. नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951,
  3. पाहणी पत्रक,
  4. नमुना नंबर एक हक्क नोंद पत्रक,
  5. क पत्रक,
  6. नमुना नंबर दोन हक्क नोंद पत्रक,
  7. कुळ नोंदवही,
  8. सातबारा उतारा
  9. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासावे.

  10. आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी

03.मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र साठी शिंदे 

            सरकारच्या जी आर नुसार प्रक्रिया-

    मराठवाड्यामध्ये गुंजत प्रमाणपत्र साठी शिंदे सरकारच्या जीआरनुसार 1967 सालच्या किंवा त्या अगोदर                 जन्मलेल्या रक्ताच्या नात्यातील कोणत्याही व्यक्तीचा कुणबी जात सिद्ध करणारा पुरावा द्यावा लागतो त्याप्रमाणे     वरील यादीतीलआवश्यक पुरावे जमा करता येतील.

    परंतु मराठवाड्यातील कुणबी मराठा आंदोलन श्री मनोज पाटील जरांगे यांनी महाराष्ट्रातील उर्वरित मराठा             समाजातील सर्व लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली
    मराठवाड्यातील लोकांना कुणबी जप प्रमाणपत्र इशू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली त्या             समितीने 45 दिवसात एक कोटी 72 लाख दस्तावेज तपासून त्यामधून 13500 नोंदी शोधले आहेत आणि समितीच्या सर्वेनुसार अनेक मराठा कुटुंबाच्या दोन किंवा तीन पिढ्याच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत


04.सगेसोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रे:

महाराष्ट्र राज्य सरकारकडून 26 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र अनुसूचित जाती व जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अधिनियम 2000 बाबत आहे. यामध्ये सगे-सोयरे या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना सगे सोयरे म्हणजे कुणबी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वडील,आजोबा,पंजोबा, खापर पंजोबा किंवा त्या अगोदर च्या पिढ्यामध्ये स्वजातीत झालेल्या लग्न संबंधातूनतयार झालेले नातेवाईक यांचा सगे सोयरे यामध्ये समावेश करण्यात येईल.

ज्या मराठा समाजातील लोकांच्या कुणबी पुरावे सापडले आहेत त्यांच्या पुराव्यानुसार त्यांच्या गणगोततील सर्व नातेसंबंधातील लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील

ज्या व्यक्तीची नोंद पुराव्यानिशी कुणबी म्हणून सापडले आहे म्हणजेच सामाजिक परंपरेनुसार स्व-जातीतील

झालेले लग्न किंवा तत्सम नातेसंबंध सोयरे की अशा लोकांना प्रमाणपत्र मिळवता येईल

सर सगळे सोयरे याचा अर्थ ज्या घरातील किंवा ज्या कुटुंबातील सत्ता किंवा व्यवहार किंवा निर्णय हे वडील घेतात किंवा घरातील पुरुष मंडळी घेतात अस्यांचा समावेश सगळे सोयरे यामध्ये केला जाईल

जर कुणबी नोंद सापडलेल्या मराठा समाजातील विवाह एकाच जातीतील असतील अशा नातेसंबंधातील सगळे सोयरे यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करता येईल यासाठी विवाह त्या जातीतील आहे याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. पुरावे सादर केल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र देण्यात येइ. 

05.कुणबी नोंदीवरून ४५ दिवसांत जात प्रमाणपत्र:

शासनाने स्थापित केलेल्या शिंदे समितीने 12 विभागातील पुरावे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्राह्य धरले जातील असे स्पष्ट केले आहे.ज्यांच्याकडे कोणाकडे 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडल्या असतील त्यांनी वंशावळ जुळून कागदपत्रासह तहसीलदाराकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधिताला 45 दिवसात कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सरकार द्वारा करण्यात आलेले आहे

06.अर्जासोबत कोण-कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील:

  • वंशावळ (वडिल, आजोबा, पणजोबा) काढून त्याची पुराव्यानिशी जुळवावी लागणार
  • वंशावळ (वडिल, आजोबा, पंजोबा)
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • जात स्वयंघोषणा प्रमाणपत्र
  • शाळेचा दाखला (TC) किंवा बोनाफाईड(प्रवेश निर्गम उतारा )
  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • अर्जदराचे पासपोर्ट फोटो
  • रेशनकार्ड
  • जुना सातबारा उतारा
  • खासरा प्रमाणपत्र
  • जन्म-मृत्यू नोंदीचा पुरावा (1967 पूर्वीचा)
  • कुटुंबातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र (बंधनकारक नाही)
  • कुणबी नोंद (1967 च्या पूर्वीची नोंद)
  • नात्यातील कोणाकडे जर नोंद असेल, तर त्यांचे कुणबी शपथपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

07.कुणबी जात प्रमाणपत्र कुठे आणि कसे मिळणार?:

  • जात प्रमाणपत्र काढण्याची जि प्रक्रिया इतर जातीतील लोकांना आहे तीच प्रक्रिया इथे पण लागू होणार आहे
  • जसे प्रत्येक जात प्रमाणपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालय मध्येच अर्ज करावा लागतो .
  • वरील प्रमाणे जे काही पुरावे सरकार द्वारा ठरवले गेले आहे त्यापैकी अर्जासोबत लागणारे पुराव्यानिशी अर्ज सदर करता येणार आहे .
  • कार्यालयात सादर केलेल्या अर्जाची पडताळणी प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाते
  • प्रांत अधिकार्याच्या तपासानंतर त्यांचा स्वाक्षरीने अर्जदाराला कुणबी जात प्रमाणपत्र


08.आपली कुणबी नोंद येथे पहा ऑनलाईन सर्व जिल्ह्यांची |

kunbi nond kashi shodhavi:

1) अकोला - https://akola.gov.in/mr/?&s=कुणबी

2) अमरावती - https://amravati.gov.in/mr/?&s=कुणबी

3) अहमदनगर - https://ahmednagar.nic.in/?&s=कुणबी

4) कोल्हापूर - https://kolhapur.gov.in/?&s=कुणबी

5) गडचिरोली - https://gadchiroli.gov.in/mr/?&s=कुणबी

6) छत्रपती संभाजीनगर - https://aurangabad.gov.in/?&s=कुणबी

7) जळगाव - https://jalgaon.gov.in/mr/?&s=कुणबी

8) जालना - https://jalna.gov.in/?&s=कुणबी

9) ठाणे - https://thane.nic.in/mr/?&s=कुणबी

10) धाराशिव - https://osmanabad.gov.in/mr/?&s=कुणबी

11) धुळे - https://dhule.gov.in/mr/?&s=कुणबी

12) नंदुरबार - https://nandurbar.gov.in/mr/?&s=कुणबी

13) नागपूर - https://nagpur.gov.in/mr/?&s=कुणबी

14) नांदेड - https://nanded.gov.in/?&s=कुणबी

15) नाशिक - https://nashik.gov.in/mr/?&s=कुणबी

16) परभणी - https://parbhani.gov.in/mr/?&s=कुणबी

17) पालघर - https://palghar.gov.in/?&s=कुणबी

18) पुणे - https://pune.gov.in/mr/?&s=कुणबी

19) बीड - https://beed.gov.in/?&s=कुणबी

20) भंडारा - https://bhandara.gov.in/mr/?&s=कुणबी

21) हिंगोली - https://drive.google.com/drive/folder...

22) बुलढाणा - https://buldhana.nic.in/en/home-new-m...

23) चंद्रपुर - https://chanda.nic.in/en/maratha-kunb...

24) गोंदिया - https://gondia.gov.in/en/kunbi-marath...

25) रत्नागिरी - https://drive.google.com/drive/folder...

26) मुंबई उपनगर - https://mumbaisuburban.gov.in/mr/?&s=...

27) मुंबई शहर - https://mumbaicity.gov.in/mr/?&s=कुणबी

28) यवतमाळ - https://yavatmal.gov.in/mr/?&s=कुणबी

29) रायगड - https://raigad.gov.in/?&s=कुणबी

30) लातूर - https://latur.gov.in/?&s=कुणबी

31) वर्धा - https://wardha.gov.in/?&s=कुणबी

32) वाशिम - https://washim.gov.in/?&s=कुणबी

33) सांगली - https://sangli.nic.in/mr/?&s=कुणबी

34) सातारा - https://www.satara.gov.in/?&s=कुणबी

35) सिंधुदुर्ग - https://sindhudurg.nic.in/?&s=कुणबी

36) सोलापूर - https://solapur.gov.in/?&s=कुणबी

------------------------------------------Thank you-----------------------------
Read More:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.